बिडकीन- औरंगाबाद-पैठण रोडवरील बिडकीन जवळील बंगला तांडा येथे विहिरीत अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. हा मृतदेह पुरुषाचा असून पाण्यात तरंगत असल्याचे आढळून आले. बुधवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास मृतदेह तरंगत असल्याची चर्चा बिडकीन गावात सुरू झाली. त्यानंतर घटनास्थळी लोकांची गर्दी झाली होती. मात्र विहिरीतून मृतदेह काढण्यासाठी कोणीही पुढाकार घेतला नाही. पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतरही पोलिस घटनास्थळी गेलेच नाही. त्यामुळे तासनतास मृतदेह विहिरीतच तरंगत राहीला.
विहिरीत मृतदेह असल्याचे
लक्षात आल्यानंतर स्थानिक नागरिकांनी याबाबत बिडकीन पोलिस ठाण्यात माहिती
दिली. मात्र बिडकीन पोलिस ठाण्यात आज वरिष्ठ अधिकाऱ्यांची तपासणी असल्याने घटनेची माहिती देऊन ही
पोलिस घटनास्थळी
गेलेच नाही. त्यामुळे अनेक तास उलटून ही मृतदेह विहिरीतच तरंगत आहे. पोलिसांच्या
या कृती मुळे नागरिकांमध्ये रोष पहायला मिळाला. मृतदेहाची ओळख अद्याप
पटु शकलेली नाही.












